By  
on  

नवाजुद्दीनचा ‘फोटोग्राफ’ पोहोचला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

 

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्राचा अलीकडेच रिलीज झालेला सिनेमा ‘फोटोग्राफ’ याला ‘न्यूयार्क इंडियन फिल्म फेस्ट’ मध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. वेरायटी डॉट कॉमच्या या महोत्सवातील ३ सिनेमांपैकी एक सिनेमा हा असेल. ७ मे पासून सुरु होणारं हे फेस्टिव्हल १२ मे पर्यंत चालेल. याशिवाय या महोत्सवात दिग्दर्शकांचं चर्चासत्र देखील आयोजित केलं जाईल. ‘फोटोग्राफ’चं स्क्रीनिंग १० मे ला होईल. हा सिनेमा सर्वप्रथम सनडान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवला गेला होता. त्यानंतर बर्लिन फेस्टीव्हल मध्येही या सिनेमाने पसंतीची पावती मिळवली होती. समीक्षकांनींही या सिनेमाचं चांगलं कौतुक केलं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive