पाहा सलमान खानचा 'भारत'मधील फर्स्ट लूक; वयस्कर लूकमध्येही दिसतोय रुबाबदार

By  
on  

'भारत' या बहुचर्चित सिनेमातील सलमान खानचा फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे. सलमान खान पहिल्यांदाच एका वयस्कर रुपात यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर आला आहे. सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा लूक शेअर करत चाहत्यांना याबबातची माहिती दिली. यासोबतच त्याने एक छानसं कॅप्शनसुध्दा दिलंय. तो म्हणतोय जितके सफेद केस माझ्या दाढी आणि केसांमध्ये आहेत त्यापेक्षा बरंच जास्त रंगीन माझं आयुष्य आहे.

ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/BwQ7bL4Fp4p/

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share