By  
on  

राणी मुखर्जी २०२० मध्ये उतरणार दिग्दर्शनात, चाहत्यांना उत्सुकता

बॉलिवूडच्या चतुरस्त्र अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राणी मुखर्जी. राणीच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत. राणी मुलीच्या जन्मानंतर ‘मर्दानी २’ मधून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. याशिवाय राणी आता दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याचं बोललं जात आहे.

२०२०मध्ये राणी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा २०२०च्या अखेरपर्यंत फ्लोअरवर जाईल अशी आशा आहे. राणीला या नव्या रुपात पाहण्यास चाहतेही उत्सुक आहेत. या वर्षाखेरीस ‘मर्दानी २’ रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाविषयी बोलताना राणी म्हणते, या सिनेमाविषयी मलाही उत्सुकता आहे. या सिनेमाची कथा नेहमीपेक्षा वेगळी आहे’. राणी मर्दानीच्या पहिल्या भागात शूर पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive