By  
on  

उलगडलं 'भारत'चं दुसरं पोस्टर, सलमान दिसतोय खुप तरुण

वयोवृध्द सलमान खान पाहिल्यानंतर आता भारत सिनेमाचं दुसरं पोस्टर उलगडलं आहे. ह्यात सलमान खान खुपच तरुण दिसतोय. इतका तरुण की त्य़ाच्या सध्याच्या वयापेक्षाही जास्त तरुण. तर काल प्रदर्शित झालेल्या भारतच्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान चक्क म्हातारा दिसून आला होता. या नव्या पोस्टरवर जवानी हमारी जानेमन थी!, अशी हटके टॅगलाईन पण देण्यात आली आहे.

ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/BwTgMPGlIRG/?utm_source=ig_embed

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive