By  
on  

मराठी सिनेमातही काम करण्याची इच्छा केवळ भाषेची अडचण: सोहा अली खान

अभिनेत्री सोहा अलीखानने यापुर्वी बंगाली सिनेमात काम केलं आहे. सोहाच्या मते, प्रादेशिक सिनेमांना वास्तवाचा गंध असतो. पण भाषेच्या अडचणींमुळे सोहा अनेकदा प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करताना दिसत नाही. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, सोहाला अनेक मराठी सिनेमांच्याही ऑफर्स आल्या होत्या पण मराठी येत नसल्यामुळे त्या नाकाराव्या लागल्या असं तिने सांगितलं.

यावेळी प्रादेशिक सिनेमांबद्दलही सोहाने मत व्यक्त केलं. ती म्हणते, प्रादेशिक सिनेमा संस्कृतीचं खरं रुप आपल्या समोर उभं करतात. भाषेअभावी मी ब-याच प्रादेशिक सिनेमांमध्ये काम करू शकले नाही. मला वाटतं तुम्ही एखाद्या सिनेमात काम करणार असाल तर त्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे परफॉर्मन्स उत्तम होण्यासाठी हे खुप गरजेचं असतं. त्यामुळेच मी आतापर्यंत हिंदी, बंगाली आणि इंग्रजी सिनेमात काम केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive