By  
on  

मधुर भांडारकरने सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरबद्दल केला हा खुलासा

जिथे-तिथे नेहमीच सैफ करिनाच्या लाडक्या तैमूरची त्याच्या प्रसिध्दी वलयामुळे चर्चा सुरु असते, त्याच्याबद्दल नेहमीच काही नवीन ऐकायला मिळतं. फॅशन फेम आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर हे तैमूरवर सिनेमा करतायत अशी बरीच चर्चा मध्यंतरी रंगली होती, तसंच त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने या नावाचं रसजिस्ट्रेशन केल्याचंसुध्दा कळलं होतं. पण नुकतंएका कार्यक्रमादरम्यान खुद्द मधुर भांडारकर यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

मधुर भांडारकर म्हणतात, माझं प्रोडक्शन हाऊस नेहमीच जे आवडतील ते टायटल्स रजिस्टर करत असतात. आमच्याकडे अनेक टायटल्स आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की लगेचच आम्ही त्यावर सिनेमा करतोय. मध्यंतरी तैमूरवर सिनेमा करण्याचं मधुर भांडारकर यांनी जवलपास निश्चित केलं आहे, अशा बातम्या येत होत्या. मधुर भांडारकर यांनी यापूर्वी करिनासोबत हिरोईन हा सिनेमा केला होता.

सध्या मधुर भांडारकर हे त्यांच्या 'गालिब' सिनेमामध्ये व्यस्त आहेत. मागील 6-7 महिन्यांपासून त्यांचं 'गालिब' सिनेमाच्या रिसर्चचं काम सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे नुकतंच सिनेसृष्टीतील योगदानासाठी मास्टार दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने मधुर भांडारकर यांना सन्मानित करण्यात आलं

Recommended

PeepingMoon Exclusive