यासाठी इरफान खानच्या 'अंग्रेजी मिडीयम'च्या सेटची सुरक्षा वाढवण्यात आली

By  
on  

आजारपणामुळे बराच काळ सिनेमांपासून दूर राहिलेला चतुरस्त्र आणि लाडका अभिनेता इरफान खान हळूहळू आता पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. त्याने आपले अर्धवट प्रोजेक्टस् पूर्ण करायला घेतले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तो 'हिंदी मिडीयम'चा सिक्वल 'अंग्रेजी मिडीयम'ची शूटींग उद्यपूरमध्ये करतोय. या गुणी अभिनेत्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत पण त्यापूर्वीच त्यांनी हजारोंच्या संख्येने इरफानच्या या सिनेमाच्या सेटवर त्याला पाहण्यासाठी गर्दी करु लागले आहेत आणि म्हणूनच या सुरक्षेच्या कारणास्तव 'अंग्रेजी मिडीयम'च्या निर्मात्यांना सुरक्षेत खुप वाढ करावी लागली आहे.

प्रोडक्शन युनिटच्या एका सूत्राने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, लोकांना जेव्हापून हे कळलंय इरफान ब्रह्मपुरीमध्ये शूटींग करतोय, तेव्हापासून इरफानची एक झलक पाहण्यासाठी ते गर्दी करु लागले आहेत. म्हणूनच संपूर्ण टीमच्या सुरक्षेसाठी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. इरफानकडे आधीच 18 सुरक्षारक्षकांची टीम तैनात आहे. पण  कुठलीही दुर्घटना आणि सामान्यांना त्रास होऊ नये म्हणून अधिक सुरक्षा वाढवण्यात आलीय.

जवळपास एक महिन्यापर्यंत ही शूटींग संपूर्ण होईल आणि पुढील शेड्यूलसाठी युनिट लंडनला रवाना होईल. आजारपणामुळे जवळपास वर्षभरानंतर पुन्हा कॅमे-यासमोर येताना म्हणजेच आपला पहिला शॉट देताना इरफान खुपच भावूक झाल्याचं सिनेमाचे निर्माते दिनेश विजान यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं.

Recommended

Loading...
Share