By  
on  

मलायकाच्या ‘friends gang’च्या हॅपनिंग पार्टीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

मलायका आणि अमृता अरोरा आणि करीना- करिष्मा या भगिनी एकमेकिंच्या खास मैत्रिणी आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे. त्या अनेकदा एकत्र हॅंगआउट करताना किंवा पार्टी करताना दिसतात. कितीही कामात व्यस्त असल्यातरी एकमेकिंसाठी त्या आवर्जून वेळ काढताना दिसतात. आताही मलायका अरोराने ‘friends gang’ साठी एका समर नाईट पार्टीचं आयोजन केलं होतं. मलायकाच्या टेरेसवर झालेल्या या पार्टीचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या पार्टीत अमृता, मलायका आणि करीना दिसत आहेत. या चौकडीपैकी करिष्मा मात्र या पार्टीत दिसून आली नाही. सध्या मलायका आणि अर्जूनच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. इंडस्ट्रीतील प्रत्येकाला त्यांच्या नात्याची आता चांगलीच कल्पना आली आहे. अनेक बॉलिवूड पार्ट्या असोत किंवा दोघांपैकी एकाचे कौटुंबिक सोहळे नेहमीच ते एकत्र स्पॉट होतात. काही दिवसांपुर्वी दोघांनी मालदिव येथे एकत्र सुट्ट्याही एंजॉय केल्या होत्या. याशिवाय काही दिवसांपुर्वी हे कपल हॉस्पिटलमध्येही एकत्र स्पॉट झाले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive