‘कलंक’च्या माथी यशाचा टिळा, पाहा सिनेमाची आतापर्यंतची कमाई

By  
on  

करण जोहरचा आतापर्यंतचा सर्वात चर्चित सिनेमा म्हणजे ‘कलंक’. करण जोहरच्या ‘कलंक’ने प्रदर्शानापुर्वीच प्रसिद्धी मिळवण्यास सुरूवात केली होती. मल्टीस्टारर कलंक आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अभिनयाने सजला आहे. हा सिनेमा अभिषेक वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘कलंक’ आतापर्यंत २०१९चा हायेस्ट ओपनिंग सिनेमा बनला आहे. कलंकने पहिल्या दिवशी 21.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. केसरी, गली बॉय आणि टोटल धमाल या सिनेमांच्या तुलनेत हा आकडा कितीतरी मोठा आहे. दुस-या दिवशी मात्र या आकड्यात घट दिसून येत आहे. दुस-या दिवशी ‘कलंक’ने ११.४५ कमाई केली आहे. पण अजून वीकेंड बाकी असल्याने कलंकच्या कमाईत वाढ होण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत.

Recommended

Loading...
Share