By  
on  

यासाठी कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ला दीपिकाच्या फाउंडेशनने केला विरोध

कंगना आणि विवाद यांचं घट्ट समीकरण आहे. सध्या आणखी एका कारणामुळे कंगनाचं नाव वादाशी जोडलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. या पोस्टरमध्ये राजकुमार आणि कंगना दोघांचीही मेंटलगिरी दिसून येत आहे. पण या पोस्टरवर दीपिकाच्या लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशनने नाराजी व्यक्त केली आहे. या फाउंडेशनने ट्वीट करत या पोस्टरवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपण अशा शब्दांचा किंवा कृतीचा वापर टाळला पाहिजे जी एखाद्याच्या मानसिक अवस्थेमुळे मन दुखावणारी असेल.

https://twitter.com/TLLLFoundation/status/1119552905307152384

इंडियन सायकॅट्रिक सोसायटीने सेंसॉर बोर्डाला एक गंभीर निवेदन सादर केलं आहे. यामध्ये म्हट्लं आहे की या ‘सिनेमाच्या निमित्ताने मानसिक रुग्णांच्या स्थितीची चेष्ट तर केली जात नाहीये ना, याकडे सिनेमाने लक्ष द्यावे.’ मेंटल है क्या’ ब्लॅंक कॉमेडी सिनेमा आहेच याशिवाय एक थरारपटही आहे. हा सिनेमा आता २१ जून २०१९ मध्ये रिलीज होत आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive