आतापर्यंतची सर्वात तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा म्हणून ‘कलंक’ कडे पाहिलं जातं. यासोबत करण जोहर सारखा निर्माता आणि धर्मा सारखी प्रॉडक्शन कंपनी या सिनेमाशी जोडली आहे. त्यामुळे रसिकांच्या आणि समीक्षकांच्या या सिनेमाकडून खुप अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांच्या कसोटीवर कलंकची वाटचाल धीमी दिसून येत आहे. विशेश म्हणजे या आठवड्यात आलेल्या दोन सुट्ट्यांचा लाभ कलंकला घेता आला आहे. ‘कलंक’ ने आतापर्यंत पहिल्या दिवशी 21.60 कोटी, दुस-या दिवशी 11.45 कोटी आणि तिस-या दिवशी 11.60 कोटी आणि चौथ्या दिवशी 12 कोटी मिळून आतापर्यंत 56.65 कोटींचा गल्ला जमवला आहे.
रविवारी या सिनेमाला अधिकाधिक गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सिनेमात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय रसिकांना पाहता येणार आहे.