सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा असा आहे दमदार ट्रेलर

By  
on  

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा ट्रेलर अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान खान समोर येतो आणि अचानक फ्लॅशबॅकमध्ये जातो. आपण पाहिलंच असेल यापूर्वी तरुणपणीच्या सलमानचा सिनेमातील एक लुक उलगडला होता  एका सर्कसमध्ये सलमान त्याचा मित्र सुनील ग्रोव्हरसोबत स्टंटमॅन म्हणून कामाला असतो. तर अभिनेत्री दिशा पटानी तिथे डान्सर म्हणून काम करते. ट्रेलरमध्ये भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या निधनाचा सीनही पाहायला मिळतो.

बेरोजगारी वाढल्याने सलमान आणि सुनील कामाच्या शोधात असतात. एकदा ते सरकारी ऑफीसमध्ये जातात कामासाठी तिथे कतरिना कैफ म्हणजेच मॅडमजी तिथे कामगारांचे फॉर्म भरुन घेत असते. तिथे सलमानची तिच्याशी गाठ पडते आणि तो प्रेमात पडतो.त्यानंतर सलमानची बॉर्डर क्रॉस करण्याचा सीनसुध्दा पाहायला मिळतो. एकूणच काय अॅक्शन, ड्रामा लव्हस्टोरी आणि देशभक्ती असा पुरेपूर बॉलिवूड मसाला या सिनेमात खच्चून भरल्याचा अंदाज ट्रेलर पाहून येतोय.

पाहा ट्रेलर :

https://youtu.be/Ea_GKoe81GY

'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा पहायला मिळणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

भारत हा मल्टीस्टारर सिनेमा येत्या 5 जून 2020 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Recommended

Loading...
Share