‘स्टुडंट ऑफ द इयर२’ हे गाणं ऐकून तुमचे पायही थिरकायला लागतील

By  
on  

सध्या चर्चा आहे ती अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांचा डेब्यु सिनेमा ‘स्टुडंट ऑफ द इयर२’ ची. या सिनेमातील नवं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘मुंबई दिल्ली दी कुडियां’ असं नाव असलेलं हे गाणं ऐकून तुमचेही पाय थिरकायला लागतील यात शंका नाही.

https://www.youtube.com/watch?v=IWZFRzF_ndg

या गाण्यात अनन्या आणि ताराचा खास अंदाज दिसून येत आहे. हे गाणं आलियाच्या ‘राधा’ गाण्याची आठवण करून देईल यात शंका नाही. यापुर्वी या सिनेमातील ‘द जवानी दीवानी’ रिलीज झालं होतं. यात या तिघांचाही मॉडर्न अंदाज दिसला होता. येत्या 10 मे रोजी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ हा करण जोहरची निर्मिती असलेला फ्रेश सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share