कतरिना कैफ साकारणार ‘गोल्डन गर्ल’ पी.टी उषा?

By  
on  

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड जोरात आहे. मागील वर्षात अनेक बायोपिक्सनी मोठा पडदा गाजवला आहे. आता यात आणखी एका बायोपिकची भर पडणार आहे. दिग्दर्शक रेवती वर्मा ‘गोल्डन गर्ल’ पी.टी उषा हिच्या जीवनावर बायोपिक बनवणार असल्याचं समजलं आहे. विशेष म्हणजे यासाठी अभिनेत्री कतरिना कैफला विचारणा करण्यात आली आहे. कतरिनाने अजून या सिनेमाला होकार कळवलेला नाही. कतरिनाने या सिनेमाला होकार दिल्यास हा तिच्या करीअरमधील पहिलाच बायोपिक असेल यात शंका नाही. या बायोपिकसाठी कतरिनाने होकार दिल्यास भारताला बायोपिकमध्ये ग्लॅमरस ‘गोल्डन गर्ल’ दिसेल यात शंका नाही. कतरिना सध्या सलमानसोबत ‘भारत’ सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. या सिनेमातील तिच्या साध्या लूकने रसिकांची मनं जिंकली आहेत.

Recommended

Loading...
Share