सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनचा कॅमिओ, दिग्दर्शकाने सांगितली ही गोष्ट

By  
on  

बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या बहुचर्चित 'भारत' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच 'भारत' ट्रेलर उलगडला आणि ह्या दमदार ट्रेलरने प्रेक्षकांना भुरळच घातली. कतरिना कैफ आणि सलमान खान ही सुपरहिट जोडी प्रेक्षकांवर पुन्हा एकदा आपली जादू करण्यासाठी सज्ज झाली आहे.

https://www.instagram.com/p/BwbOxoTFfC-/

महत्त्वाचं म्हणजे अभिनेता वरुण धवन 'भारत'मध्ये कॅमिओ करताना पाहायला मिळणार आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राने या सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या सिनेमातील व्यक्तिरेखेबद्दल काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. ते फक्त एवढंच म्हणाले, "वरुण हा एक खुप चांगला अभिनेता आहे. त्याला सलमान आणि कतरिनाची जोडी खुप आवडते. तो जेव्हा 'भारत'च्या सेटवर आला होता तेव्हा सर्वांनी खुप धम्माल मस्ती करत मोठी पार्टी केली होती." पण हे सांगताना अली अब्बास जफर यांनी एक मात्र नक्की स्पष्ट केलं ते म्हणजे, वरुणचा सिनेमातील हा सीन खुपच रंगतदार होणार आहे.

https://www.instagram.com/p/BwpV_wRFEh7/?utm_source=ig_embed

येत्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून रोजी 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Recommended

Loading...
Share