By  
on  

‘ब्रम्हास्त्र’ होणार या वेळी रिलीज, सोशल मिडियावर केलं जाहीर

 

दिग्दर्शक अयान मुखर्जी सध्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. ब्रम्हास्त्र हा अयान मुखर्जीचा महत्त्वकांक्षी सिनेमा आहे. हा एक सुपरहिरो सिनेमा असल्याचं अयानने यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट आहेत. या सिनेमापासूनच बॉलिवूड्च्या सिझलिंग कपल आलिया-रणवीरच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. शिवा अणि इशा असं या दोघांचं या सिनेमातील नाव आहे. या सिनेमाचा लोगो लाँच करण्यासाठी कुंभमेळा आणि महाशिवरात्रीचा मुहुर्त अयानने साधला होता.

हा सिनेमा या वर्षाखेरीस रिलीज होणार होता. पण अयान मुखर्जीने नुकतंच एक ट्वीट करत सिनेमा २०२०मध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. हा सिनेमा यावर्षी रिलीज झाला असता तर त्याला सलमानच्या ‘दबंग ३’ शी सामना करावा लागला असता. त्यामुळेही अयानने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive