By  
on  

रणबीरसोबतच्या ब्रेक अपबद्दल पहिल्यांच बोलली कतरिना

बॉलिवूडसाठी धक्कादायक ठरलेलं ब्रेक अप म्हणजे रणबीर आणि कतरिनाचं. बॉलिवूड्च्या ‘एवर स्वीट’ कपलचं ब्रेक अप अनेकांसाठी धक्का होता. पण याबद्द्ल त्यावेळी ना रणबीरने कोणता खुलासा केला ना कतरिनाने.

कतरिनाने अलीकडेच रणबीरसोबतच्या या नात्याबद्दलचं मौन सोडलं आहे. कतरिनाने ब्रेक अपचा हा काळ एका समंजस व्यक्तीप्रमाणे व्यतीत केला. ब्रेक अपमधून सावरण्याबद्द्ल कतरिना सांगते, मला पहिल्यांदा स्वत:ला पुन्हा जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्यासाठी तयार करावं लागलं. मला नात्यात माझ्या बाजूची सगळी जबाबदारी पार पाडायची होती. पण मी हे देखील स्विकारलं की नात्यात जी जबाबदारी माझी नाही ती माझी समस्या नाही. या विचाराने मला बरीच उर्जा दिली. यावेळी आईच्या सहवासानेही मला बरीच प्रेरणा दिली. या काळात मी शिकले की स्त्रीने कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वत:ची अस्मिता कायम ठेवणं गरजेचं असतं. प्रेम तुम्हाला सगळं काही देऊ शकतं. पण तुमची अस्मिता देऊ शकत नाही.’ कतरिना सध्या भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा ५ जूनला प्रदर्शित झाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive