By  
on  

असा आहे राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2'मधील फर्स्ट लूक

अभिनेत्री राणी मुखर्जीने 'मर्दानी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. या पोलिसपटात शिवानी शिवाजी रॉय ही तडफदार भूमिका साकारत राणीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच या सिनेमाचा सिक्वल येतोय. 'मर्दानी 2' मधील राणी मुखर्जीचा फर्स्ट लूक नुकताच उलगडलाय.

या नव्या लूकमध्येसुध्दा राणी प्रिक्वलसारखीच तडफडदार आणि निर्भिड दिसून येतेय. त्यामुळे गुंडाराज आणि दृष्ट प्रवृत्तींचा सामना करायला ती सज्ज झाल्याचं यावरुन लक्षात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाची कथा मुंबई ते राजस्थान या दरम्यान फिरते त्यामुळे सिनेमाचं शुटींगसुध्दा तसंच करण्यात येत आहे. राणीच्या चागत्यांमध्ये या सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

राणी मुखर्जीचे पती आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेला ‘मर्दानी 2’ हा ब्लॉकबस्टर 'हिचकी'नंतरचा दुसरा सिनेमा आहे. नवोदित दिग्दर्शक गोपी पुथरन या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive