By  
on  

मराठी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक होतं : कृती सनोन

अभिनेत्री कृती सनोनचा 'पानिपत' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या भूमिकेविषयी कृतीने नुकताच एक  उलगडा केला आहे. प्रथमच एका ऐतिहासिक सिनेमात काम करणा-या कृतीसाठी एक मराठी व्यक्तिरेखा साकारणं खुप आव्हानात्मक होतं.

कृती म्हणते, "मी महाराष्ट्रीयन नसल्याने माझ्यासाठी एक मराठी व्यक्तिरेखा साकरणं फार कठीण होतं. पण दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी माझ्यासाठी ते फारचं सोप्पं आणि मजेशीर करुन दिलं."

'पानिपत' हा युध्दावर आधारित सिनेमा आहे. मराठी सेनापती सदाशीव भाऊ यांची दुसरी पत्नी पार्वतीबाई ह्यांच्या व्यक्तिरेखेत कृतीला पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/BvLmSOCAcmH/

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमाचं शुटिंग सर्वप्रथम जयपुरमध्ये पार पडलं. त्यानंतर आता मुंबईमध्ये शूट करत आहेत. क्रितीसोबतच ह्या सिनेमात अर्जुन कपूर आणि संजय दत्त हे प्रमुख व्यक्तिरेखेत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive