By  
on  

‘छपाक’च्या दुस-या शेड्युलचं शुटिंग सुरु, मुंबईमध्ये करणार शुटिंग

दीपिकाची निर्मिती असलेल्या छपाकच्या पहिल्या शेड्युलचं दिल्लीमधील शुटिंग संपलं आहे. दिल्लीमधील अरुंद गल्ल्यांमध्ये शुटिंग केल्यानंतर सगळी टीम मुंबईला रवाना झाली आहे. साऊथ मुंबईमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरु झालं आहे.

 

या सिनेमाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी झळकणार आहे.  दिपिका ‘छपाक’ या सिनेमातून निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या सिनेमासाठी मेघना गुलजार तिची सहनिर्माती आहे.  या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे. दीपिकाचं या सिनेमात नाव मालती असं आहे. या 25 मार्च ला सिनेमाच्या पहिल्या शेड्युलचं शुटिंग सुरु झालं होतं. दीपिकाला लक्ष्मीच्या गेटअपमध्ये येण्यासाठी बराच काळ मेक अप करावा लागत असल्याचंही स्पष्ट केलं होतं. हा सिनेमा १ जानेवारी २०२०मध्ये रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive