By  
on  

जाणून घ्या कधी सुरु होतेय,अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी'चं शूटींग

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'सूर्यवंशी' या बहुप्रतिक्षीत सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाबाबतच्या अपडेट्सची प्रचंड उत्सुकता आहे. जेव्हा अक्षय कुमारसोबत या सिनेमात कतरिना कैफची केमिस्ट्री पाहायला मिळणार असल्याचं कळल्यापासून चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या 6 तारखेपासून हा सिनेमा फ्लोअरवर जाईल व सिनेमाच्या शूटींगला खरी सुरुवात होईल.

महत्त्वाचं म्हणजे यामुळेच कतरिना आणि अक्षय ही सुपरहिट जोडी तब्बल 9 वर्षाने एकत्र झळकतेय. या जोडीने अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. फरहा खान दिग्दर्शित 'तीस मार खॉंन' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

सूत्रांनी पिपींगमूनला यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार कतरिना सिनेमात अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.यासाठी या पोस्टरचं पण फोटोशूट पार पडल्याची माहिती मिळतेय.

 

Recommended

PeepingMoon Exclusive