By  
on  

‘चाशनी’मध्ये रसिकांना दिसणार सलमान-कतरिनाच्या प्रेमाचा गोडवा

सलमान-कतरिनाच्या भारत सिनेमाचं नवं गाणं ‘चाशनी’ रिलीज झालं आहे. या सिनेमातील पहिलं रोमॅंटिक गाणं या निमित्ताने रसिकांसमोर आलं आहे. या गाण्यात सलमान तरुण दिसत आहे तर कतरिनाही सिल्की केसांऐवजी कुरळ्या केसांमध्ये दिसत आहे. या गाण्याला विशाल-शेखरने स्वरसाज चढवला आहे.  माल्टामधील निसर्गरम्य देखाव्यांवर चित्रित झालेलं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘भारत’चं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं असून ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तब्बू, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, दिशा पटनी हे कलाकार देखील आहेत. या सिनेमात सलमान अनेक रुपात रसिकांच्या समोर येणार आहे. सलमान पहिल्यांदाच हा प्रयोग करत असल्याने त्याच्या फॅन्समध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता आहे.

https://www.youtube.com/watch?v=tTHNWT3dU-E

Recommended

PeepingMoon Exclusive