By  
on  

Confirmed! या दिवशी येणार वरुण-सारा स्टारर 'कुली नं 1'चा रिमेक

डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि गोविंदा व करिश्मा कपूर स्टारर 'कुली नं 1'च्या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान ही नवी जोडी झळकतेय. सलमान खानच्या जुडवाचा रिमेकमधून धम्माल उडवल्यानंतर वरुण आता पुन्हा एका रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सर्वांनाच या सिनेमाबाबतची उत्सुकता असताना आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

अभिनेता वरुण धवननेच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आपल्या ट्विटरवरुन उलगडली आहे. कुली बॅचचा फोटो शेअर करत हा सिनेमा पुढील वर्षी 1 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचं त्याने चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

https://www.instagram.com/p/Bw7So-NByG4/

 

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीचा सुपरहीट ‘कुली नंबर 1’ हा सिनेमा रिमेक म्हणून पुन्हा पाहायला मिळण्याची प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. येत्या जुलैमध्ये हा सिनेमा फ्लोअरवर जाणार आहे. सर्वांनाच आता वरुण -साराच्या जोडीची धम्माल पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive