By  
on  

ऐश्वर्या-आराध्याचा क्युट व्हिडियो तुम्हाला देईल ‘Mom-daughter goals’

अभिनेत्री ऐश्वर्याच्या नावावर दैदिप्यमान यशाची नोंद नसली तरी लाईम लाईटमध्ये कसं रहायचं हे तिला चांगलंच माहिती आहे. काही दिवसांपुर्वीच अभिषेकने ऐश्वर्याचा थायलंड ट्रीपमधील एक ग्लॅमरस फोटो शेअर केला होता. या फोटोवर लाईक्सचा वर्षावही झाला होता. हे सेलिब्रिटी कपल आराध्यासह नुकतेच दहाव्या अनिव्हर्सरीनिमित्त थायलंड दौरा करून आले. अलीकडेच ऐश्वर्या एका सेलिब्रिटी फुटबॉल मॅचमध्ये आराध्यासोबत दिसून आली. विशेष म्हणजे यावेळी ऐश्वर्या अभिषेक बच्चनला चीअर करण्यासाठी आली होती. यादरम्यानचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. यावेळी ऐश्वर्यासोबत असलेली आराध्या वडिलांना पाहताच आईचा हात सोडून वडिलांकडे जाते. अभिषेक आराध्याला उचलून घेतो. यावेळी दोघांमध्ये काहीतरी बोलणं होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Bw7p56wDw7g/?utm_source=ig_web_copy_link

त्यानंतरच्या फोटोंमध्ये या दोघीही मायलेकी मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी दोघीही कॅज्युअल लूकमध्ये आहेत. ऐश्वर्याने निळ्या रंगाची जर्सी, लेगिंग्ज आणि स्नीकर्स घातले आहेत.

https://www.instagram.com/p/Bw8W3fVAvJZ/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive