By  
on  

अनन्या पांडेसाठी कार्तिक आर्यन आहे ‘क्युट बॉय’, म्हणते क्रश असण्यात वाईट काय!

सध्या अनन्या पांडे हे नाव ‘स्टुड्ंट ऑफ द इयर २’मुळे चर्चेत आहे. आपल्या पहिल्या वहिल्या सिनेमासाठी अनन्या भलतीच उत्साही आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अनन्याचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिचा वावर मात्र सराईत अभिनेत्रीप्रमाणेच आहे. अनन्याने अलीकडेच तिच्या क्रशबद्दल उघड चर्चा केली. अनन्या म्हणते, ‘एखाद्यावर क्रश असणं खुपच नॉर्मल आहे. कार्तिक आर्यन माझं क्रश आहे. मी स्वत:ला लकी समजते की मला पती पत्नी और वोच्या रिमेकमध्ये कार्तिकसोबत काम करण्याची संधी मिळाली.’

विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी सारा अली खाननेही कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे कार्तिक आर्यनसाठी या दोघींमध्ये छुपी चुरस असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण कार्तिक आणि अनन्याच्या लिंक अप्सच्या बातम्यांनी त्यावेळी जोर धरला जेव्हा हे दोघेही एकत्र डिनरसाठी गेले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अनन्या कार्तिकसोबत आगामी ‘पति, पत्नी और वो’ या सिनेमात झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive