प्रियांकाचा भाऊ सिध्दार्थ चोप्रा आणि इशिता कुमारचं लग्न मोडलं? जाणून घ्या सविस्तर

By  
on  

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्याच आठवड्यात भाऊ सिध्दार्थ चोप्राच्या लग्नाच्या तयारीकरिता भारतात आली होता. इशिता कुमार हिच्यासोबत सिध्दार्थचं लग्न ठरलं होतं. पण आता हे लग्न मोडल्याच्या बातम्या असून प्रियांकासुध्दा यूएसला रवाना झाली आहे. सिध्दार्थ चोप्रा आणि इशिता कुमार या दोघांचा रोका सोहळासुध्दा खुप थाटामाटात पार पडला होता. ह्या खास सोहळ्यासाठी प्रियांकाचे पती निक जोनास आणि त्याचे कुटुंबिय यूएसवरुन भारतात उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच इशिताने तिच्यावर नुकत्याच झालेल्या सर्जरीचे फोटो पोस्ट केले होते आणि आपण हळूहळू या वेदनादायी सर्जरीतून रिकव्हर होत असल्याचंही तिनं म्हटलं होतं. त्यामुळे तिच्या सर्जरीमुळे सिध्दार्थ चोप्रा आणि तिच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात येईल असे अंदाज बांधले जात असतानाच आता यादरम्यान अचानकच हे वेगळंच चित्र समोर आलं आहे.

इशिता कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवरुन रोकाविधीचे आणि सिध्दार्थसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. तसंच महत्त्वाचं म्हणजे कहानी में एक ट्विस्ट म्हणजे, इशिताने आपल्या मागच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, "चीअर्स टू न्यू बिगनींग विथ गुडबाय किस टू ब्युटिफुल एन्डींग्ज" असंही म्हटलं होतं. त्यामुळे या पोस्टचा अर्थ लग्न मोडण्यासोबत लावला जाऊ शकतो.

दरम्यान, प्रियांका आणि निक जोनास यांनी इशिताला अनफॉलो केल्याच्याही चर्चा आहेत. तसंच चोप्रा कुटुंबियांकडून याबाबत अद्यापतरी कुठलंच अधिकृत स्पष्टिकरण आलेलं नाही. त्यामुळे सर्वांनाच आता या लग्नाबाबत आणखी जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share