By  
on  

या दिवशी करिना कपूर खान सुरु करणार 'अंग्रेजी मिडीयम'ची शूटींग

चतुरस्त्र अभिनेता इरफान खान कॅन्सरच्या आजारानंतर भारतात परतला आणि त्याने त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मिडीयम'च्या शूटींगला सुरुवात केली. इरफानच्या चाहत्यांना त्याच्या सिनेमातील दमदार कमबॅकची जबरदस्त उत्सुकता लागून राहिली आहे. पण आणखी एका कारणामुळे सिनेमाबद्दल प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत ते म्हणजे ह्या सिनेमानिमित्तने करिना कपूर खान आणि इरफान खानची केमिस्ट्री पाहणं हे दुग्धशर्करा योग ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करिना कपूर खान हिने 'अंग्रेजी मिडीयम'च्या शूटींगची तयारी सुरु केली आहे. सध्या उदयपूरमध्ये सुरु असलेलं या सिनेमाच्या शूटींगचं पहिलं शेड्यूल संपून या सिनेमाची टीम मुंबईत परतेल आणि मग दुस-या शेड्यूलला सुरुवात होईल. तेव्हा करिना या टीमला जॉईन करेन.

'अंग्रेजी मिडीयम'च्या निमित्ताने करिना कपूर खान पहिल्यांदाच एका पोलिस अधिका-याच्या भूमिकेत झळकणार आहे. या निमित्तानेती दिग्दर्शक होमी अदजानियासोबत आपल्या व्यक्तिरेखेबाबत चर्चासुध्दा करते आहे. छोटी भूमिका असली तरी करिनाला या शूटींगसाठी जवळपास एक आठवडा लागेल. तसंच करिना स्वत:सुध्दा इरफानसोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे.

https://www.instagram.com/p/BwY8g8MlKGA/?utm_source=ig_embed

 

Recommended

PeepingMoon Exclusive