'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणार नीना गुप्ता

By  
on  

सर्वांनाच आत्ता रोहित शेट्टीच्या अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' सिनेमाच्या अपडेट्स जाणून घेण्याचे जबरदस्त वेध लागले आहेत. या सिनेमाचं शूटींग,धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आणि अक्षयसोबत लीड हिरोईन म्हणून कतरिना अशा सर्व महत्त्वाच्या बातम्या आल्यानंतर आता यातील आणखी एक उलगडा झाला आहे. चतुरस्त्र अभिनेत्री नीना गुप्ता या सिनेमात अक्षयच्या आईची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाशी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, "ही भूमिका मी आत्तापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा बरीच वेगळी आहे. ही एखादी नेहमी सारखी टीपिकल आई नाही, जी मुलांच्या लग्नाचं किंवा खाण्या-पिण्याच्या सतत मागे राहिल, ही एक हटके आई आहे. माझं सिनेमातील अक्षय आणि कतरिनासोबतचं ट्यूनिंग तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हालाही प्रचंड मजा वाटेल."

नीना गुप्ता ह्यांच्या 'सूर्यवंशी'मधील भूमिकेमुळे आता ह्या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Recommended

Loading...
Share