'लेखक होण्यामध्ये सुप्रियाचा मोलाचा वाटा' पंकज कपूर यांनी व्यक्त केल्या भावना

By  
on  

ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर 'दोपेहरी' हे आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित करण्याच्या तयारीत आहेत. पंकज यांच्या दोपेहरी या नाटकावर हे पुस्तक आधारित आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे नाटक प्रेक्षकांची पसंती मिळवत असून या नाटकामधील अम्मा ही  व्यक्तिरेखा नाट्यरसिकांमध्ये लोकप्रिय आहे. आता या नाटकावर पुस्तक प्रकशित होणार असून येत्या काही दिवसांमध्ये हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे.

पंकज कपूर यांना लेखन काही नवे नाही. १९८० पासून ते गीत आणि काव्यलेखन करत आहेत. आपलं पुस्तक प्रकाशित होण्याचं संपूर्ण श्रेय त्यांनी आपली पत्नी अभिनेत्री सुप्रिया पाठक यांना दिलं आहे. पुस्तक प्रकाशित होण्यासाठी सुप्रियाने मला मोलाची साथ दिली. पुस्तक प्रकाशित होण्याच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये सुप्रिया माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. पुस्तक प्रकाशित होण्यामागे संपूर्णतः सुप्रियाचं योगदान आहे, अस मत पंकज कपूर यांनी व्यक्त केलं.

पुस्तक लिहिताना पंकज कपूर यांनी चित्रपटाच्या पटकथेसारख पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे या पुस्तकावर आधारीत चित्रपट बनवायची त्यांची ईच्छा आहे.

Recommended

Loading...
Share