'तो अजून तयार नाही', मधू चोप्रा यांनी मुलगा सिद्धार्थच्या लग्नाबाबतीत अखेर मौन सोडलं

By  
on  

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ याचं लग्न मोडण्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिदधी माध्यमांमध्ये झळकल्या. सिद्धार्थची आई मधू चोप्रा यांनीसुद्धा इशिता कुमार आणि सिद्धार्थ यांच लग्न मोडण्याच्या बातमीला दुजोरा दिला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इशिता आणि सिद्धार्थ यांचा फेब्रुवारी महिन्यामध्ये रोका विधी पार पडला होता. दोघांच्या लग्नासाठी खास अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुंबईत आली होती.

एका आघाडीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये मधू चोप्रा यांनी या लग्नासंबंधी खुलासा केला की ,"सिद्धार्थ अजूनही लग्नासाठी तयार नाही. त्याला अजून स्वतःसाठी वेळ हवा आहे. तसेच लग्नासंबंधी निर्णय घाईत घेऊ नये असं आम्हाला वाटतं."

आणखी एका मुलाखतीत मधु चोप्रा यांनी वक्त्यव्य केल की,"इशिता आणि सिद्धार्थ यांनी सामंजस्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे." परंतु या मुलाखतीमध्ये  लग्न मोडण्यामागील स्पष्ट कारण मधू चोप्रा यांनी संगितलं नाही.

https://www.instagram.com/p/BwtPlDLg19f/?utm_source=ig_embed

यापूर्वी इशिताने तीच्या सर्जरीचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. काही रिपोर्ट्सच्या अनुसार इशिताची सर्जरी हे लग्न मोडण्यामागील कारण सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/Bw8gtKUgegQ/?utm_source=ig_embed

Recommended

Loading...
Share