सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी 'शेरशहा'च्या शूटिंगला सुरुवात

By  
on  

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आगामी 'शेरशाह' सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय सैन्यातील गौरवशाली व्यक्तिमत्व विक्रम बात्रा यांची व्यक्तिरेखा सिद्धार्थ साकारत असून चंदिगढ येथे या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. विक्रम बात्रा यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची रंजक कहाणी या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार कॅप्टन विक्रम बात्रांच्या बालपणीची आणि सेनेमध्ये भरती होण्यापूर्वीच्या आयुष्याची शूटिंगची  सुरुवात आधी होणार आहे. विक्रम बात्रा यांनी चंदिगढ येथील डीएवी कॉलेजमध्ये मेडिकल सायन्सचा अभ्यास केला. योगायोग म्हणजे याच कॉलेजमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे.

तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, या सिनेमासाठी खास अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमासाठी मुंबईतील मरोळ येथील पोलीस मैदानात शस्त्र हाताळण्याचे आणि वापरण्याचे विशेष प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणासंबंधी काही फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. अभिनेत्री कियारा अडवाणी सुद्धा या सिनेमात झळकणार आहे.  सिध्दार्थ आणि कियारा ही नवी जोडी सिनेमात पाहण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share