मलायका सोबतच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरने दिली ही उत्तरं, पाहा काय म्हणाला

By  
on  

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नविषयक बातम्या सध्या वारंवार प्रसिद्ध होत आहेत. या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही, असं मलायकाने वेळोवेळी सांगितलं आहे. परंतु एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने मलायकासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली.

''तुमच्या लग्नाची चर्चा सध्या सर्व ठिकाणी होत आहे. याबाबतीत तुमचं म्हणणं काय?'' असा प्रश्न अर्जुन कपूरला विचारण्यात आला. या प्रश्नाचं हसतखेळत उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला,''लोकांचे केस लग्नानंतर गळून पडतात. तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या डोक्यावर सध्या केस नाहीत त्यामुळे सध्या तरी लग्न करण्याचा माझा विचार नाही. माझे हे केस नसलेले फोटो सर्व ठिकाणी पोहोचतील. त्यामुळे लग्न करण्याचा माझा सध्या तरी काही विचार नाहीय. आणि मी माझ्या नात्याबद्दल कधी काही लपवलं नाही त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तुम्ही आदर करायला हवा.''

''आयुष्यात प्रेम आल्याने तुम्ही खुश आहात का?'' असा प्रश्न विचारला असता अर्जुन कपूर म्हणाला ''मी सध्या आनंदात आहे. आणि हाच आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी अजून काही यापुढे सांगू शकत नाही. माझं काम आणि माझं खासगी आयुष्य यामुळे मला सध्या रात्री समाधानाची झोप लागत आहे. यापुढेही हे असंच राहो हीच माझी इच्छा आहे.''

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे गेल्या अनेक महिन्यांपासून सोबत आहेत. हे दोघं लग्न कधी करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

Recommended

Loading...
Share