'भारत’मधील सलमान आणि कतरिनाचं हे नवीन गाणं तुम्ही पाहिलंत का?

By  
on  

सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत' सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमाचं नवं गाणं ‘ऐथे आ’ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर आधारित हे गाणं असून या गाण्यात अभिनेत्री कतरिना कैफ सलमानला सतवताना दिसत आहे. या चित्रपटाचं हे तिसर गाणं असून यापूर्वी स्लो मोशन’ आणि ‘चाशनी’ ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.

या गाण्यात कतरीना कैफच्या अनोख्या अदा पाहायला मिळत असून 'दबंग' सिनेमाप्रमाणे याही गाण्यात सलमानचा वेगळा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

https://youtu.be/eq6bAldOS5I

'भारत' सिनेमात सलमान वेगवेगळ्या पाच लूकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. यामध्ये सलमान १८ वर्षाच्या तरुणापासून ते ७० वर्षाच्या वयस्कर माणसाची भूमिका साकारत आहे. या सिनेमात सलमान खानसोबत कतरिना कैफ, तब्बू, दिशा पाटनी आणि सुनील ग्रोव्हर यांच्यासुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.

या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जाफर करत आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाइफ या निर्मिती संस्थेने आणि टी सीरीजने मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी ५ जुनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share