कॅन्सरच्या इलाजानंतर इरफान खानने फॅन्ससाठी लिहिली एक भावूक पोस्ट

By  
on  

बॉलीवूडमधील चतुरस्त्र अभिनेता इरफान खान कॅन्सरच्या उपचारासाठी परदेशी गेला होता. तेव्हापासून त्यासंबंधीच्या बातम्या सगळीकडे चर्चेत होत्या. कॅन्सरवर यशस्वी उपचार घेऊन इरफान आता मायदेशी परतला आहे. चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे भावुक होऊन इरफानने चाहत्यांसाठी एक कविता लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'गेल्या काही महिन्यांदरम्यान मी आजाराशी लढत होतो. व्याधींनी माझ्या शरीरावर ताबा मिळवला होता. यादरम्यान  आयुष्य खरं कसं आहे, हे शोधायचा मी प्रयत्न करत होतो. तुमच्या मनातली चिंता मला समजते आहे. म्हणूनच मी तुमच्याशी बोलू इच्छितो. माझा पुढचा प्रवास सुखकर होण्याच्या दिशेने मी आता हळूहळू वाटचाल करत आहे.' अशा शब्दांमध्ये इरफान खानने चाहत्यांशी संवाद साधला आहे.

https://twitter.com/irrfank/status/1113333655538208768

'तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि सदिच्छा माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या संपूर्ण प्रवासात तुम्ही मला मोलाची साथ दिली आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात यासाठी मनापासून मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.' असं म्हणत इरफानने कवितेतून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

२०१८ साली इरफान कॅन्सरवरील उपचारासाठी लंडनला उपचारासाठी गेला होता. कॅन्सरवर यशस्वी उपचार घेऊन इरफान नुकताच भारतात परतला आहे.

Recommended

Loading...
Share