अर्जुन आणि क्रितीच्या ‘पानीपत’मुळे लोकांना सहन करावा लागला मनस्ताप

By  
on  

मुंबापुरीला ट्रॅफिक जामची समस्या नवी नाही. त्यातच घोड्यांनी रस्ता अडवला तर ही समस्या अधिकच किचकट होते. असंच काहीसं झालं आहे ‘पानीपत’बाबत. आशूतोष गोवारीकरच्या पानीपत सिनेमाच्या शुटिंगमुळे अंधेरी वेस्टला ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. सध्या या सिनेमात घोड्यांच्या सीनचं शुटिंग सुरु आहे. मिड-डेच्या वृत्तानुसार प्रत्येक संध्याकाळी चित्रकुट ग्राउंडहून घोडे पुन्हा तबेल्याकडे जाण्यासाठी बाहेर पडतात. पण या प्रवासात घोड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकजाम होत आहे. यावर तेथील रहिवासी म्हणतात, ‘असं वाटत आहे, पानीपतचं युद्धक्षेत्र जणू आमच्या घराजवळ आहे.’ यावर प्रॉडक्शन टीमचं म्हणणं आहे की, चित्रकुट ग्राउंडचं प्रवेशद्वार अत्यंत निमुळतं आहे. त्यामुळे घोड्यांना इतर कोणत्याही रस्त्याने नेण्यास वाव नाही.

Recommended

Loading...
Share