By  
on  

मातृदिनाच्या निमित्ताने बिग बी यांनी गायलं गाणं, आईला समर्पित

मातृदिनाचं औचित्य साधून बॉलीवूडचे शेहेनशहा अमिताभ बच्चन यांनी 'माँ' हे गाणं गायलं आहे. या गाण्या निम्मित्ताने त्यांनी सर्व मातांना एक आदरांजली वाहिली आहे. 'शुजीत सरकार यांच्या कल्पनेतून हे गाणं साकारलं असून सर्व मातांना ही एक अनोखी आदरांजली असणार आहे. अनुज गर्ग यांचं संगीत आहे. पुनीत शर्मा यांनी हे गाणं लिहिलं आहे. मी आणि यजात गर्ग आम्ही दोघांनी मिळून हे गाणं गायलं आहे.' अशी या गाण्याबद्दल माहिती अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली.

https://www.youtube.com/watch?time_continue=37&v=Fia1gcooPlQ

या गाण्याचा म्यूजिक वीडियो यु ट्यूब वर आला आहे. या वीडियोमध्ये सर्व मातांच्या जन्म आणि मृत्यू साल दर्शवून त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे. या वीडियोमध्ये कृणधवल रंगात फोटो असलेले दिसून येत आहेत. वीडियोच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन यांचा एक फोटो पाहायला मिळतो. या फोटोमध्ये तरुणपणीचे अमिताभ आईसोबत असलेले दिसून येतात.

https://twitter.com/SrBachchan/status/1126818259578155008

 

“तुम आज भी मेरे पास हो … मां” अशा शब्दांनी या गाण्याची अखेर होते. पुनीत शर्मा यांनी हे गाणं लिहिलं असून अनुज गर्ग यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. मास्टर यजत गर्ग आणि अमिताभ यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. सध्या अमिताभ 'चेहरे' या आगामी थ्रिलर सिनेमाचं शूटिंग करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive