अभिनेत्री करीना कपूर खानची 'गुड न्युज' तुम्हाला माहितीय का?

By  
on  

अभिनेत्री करीना कपूर खान तीच्या आगामी 'गुड न्युज' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा रोमँटिक कॉमेडी असण्याची शक्यता आहे. या सिनेमात करीन सोबत अभिनेता अक्षय कुमार, आणि दिलजीत डोसांज सुद्धा झळकणार आहेत.

या सिनेमाबाबत बोलताना करीना म्हणाली,''गुड न्यूज हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमासाठी मी खूप उत्सुक असून माझ्यासोबत या सिनेमात अक्षय कुमार, दिलजीत डोसांज, कियारा अडवाणी यांचा सुद्धा सहभाग आहे. या सिनेमातल्या कलाकारांमुळे हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल याची मला खात्री आहे.''

https://www.instagram.com/p/BwwYbBpA9Rx/?utm_source=ig_embed

२० डिसेंबर २०१९ ला 'दबंग ३' मुळे 'गुड न्यूज' च्या बॉक्स ऑफिस कमाईवर परिणाम होईल असा प्रश्न करीनाला विचारला असता ती म्हणाली,''आमचा सिनेमा हा दबंग ३ नंतर जो आठवडा येतोय तेव्हा प्रदर्शित होत आहे. तुम्ही या दोन सिनेमांची एकमेकांशी तुलना करू शकत नाही. माझ्या मते आमच्या सिनेमाचा प्रेक्षक दबंग ३ पेक्षा वेगळा आहे.''

'गुड न्यूज' हा सिनेमा राज मेहता दिग्दर्शित करत असून करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Recommended

Loading...
Share