By  
on  

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची ‘या’ प्रसिद्ध जोडीला एकत्र आणण्याची इच्छा

दिग्दर्शक अली अब्बास जफर सध्या ‘भारत’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान आणखी एका महत्त्वाच्या बाबीचा खुलासा जफर यांनी केला आहे. जफर अनेक वर्षांपासून सलमान खान आणि शाहरुख खान यांना एकाच स्क्रीनवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या दोन्ही सुपरस्टार्सनी एकमेकांसोबत १७ वर्षांपुर्वी काम केलं होतं. त्यानंतर असा एकही सिनेमा आला नाही जो या जोडीला एकत्र आणेल. नुकताच एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये अली अब्बास यांनी ही इच्छा बोलून दाखवली. ते म्हणतात, ‘इंशाल्लाह ! हे लवकरच होईल. मला खात्री आहे, मी एखादी कथा लिहिन त्यावेळी नक्कीच त्यांना समोर ठेवून लिहेन. ते दोघंही एकमेकांसोबत काम करू इच्छितात त्यामुळे चांगली स्क्रिप्ट मिळाली तर ते नक्कीच एकत्र काम करतील’. यावरून सलमान आणि शाहरुखच्या चाहत्यांना लवकरच त्यांचा एकत्र परफॉर्मन्स बघायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive