बॉलिवूड नवाब सैफ अली खान झळकणार आणखी एका नव्या वेबसिरीजमध्ये

By  
on  

सैफ अली खान स्टारर 'सॅक्रेड गेम्स'च्या जबरदस्त यशानंतर या वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण यानंतर सैफ अली खान आणखी एका वेबसिरीजमध्ये झळकतोय. डिजीटल व्यासपीठावरसुध्दा सैफला प्रचंड लोकप्रियता मिळाली .त्याच्या चाहत्यांना तर त्याच्या 'सॅक्रेड गेम्स 2'च्या वेबसिरीजमध्ये झळकण्याची उत्सुकता लागली असतानाच ही आनंदवार्ता समजलीय.

'सॅक्रेड गेम्स 2'ची शूटींग पूर्ण झाली असून सैफ लवकरच आता या नव्या वेबसिरीजच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे अली अब्बास जफर या वेबसिरीजचं दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत. सध्या ते सलमान खान स्टारर 'भारत' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यस्त आहेत.

सैफच्या या आगामी वेबसिरीजबद्दल आणखी सविस्तर माहिती जरी मिळू शकली नसली तरी याची कथा रंजक असणार यात शंका नाही. 'सॅक्रेड गेम्स'मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या सैफ अली खानला या नव्या वेबसिरीजमध्ये पाहणंसुध्दा तितकंच उत्कंठावर्धक ठरेल.

Recommended

Loading...
Share