तर असा आहे, अभिनेता विकी कौशलच्या वाढदिवसाचा 'जोश'पूर्ण प्लॅन

By  
on  

बॉलिवूडचा सर्वात लाडका टॉल, डार्क आणि हॅण्डसम अभिनेता कोण असं म्हटलं तर पटकन विकी कौशल डोळ्यासमोर येतो. 2018 आणि 2019 ही दोन्ही वर्ष विकीसाठी खुप खास ठरली. 'राझी', 'संजू', 'मनमर्जियां' या सिनेमांनंतर विकीची प्रमुख भूमिका असलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या सिनेमाने त्याला खरी ओळख मिळवून देत प्रसिध्दीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्यानंतर तर त्याच्या मागे एकापाठोपाठ एक सिनेमांची रीघच लागली आहे. पण आता लवकरच म्हणजे येत्या 16 मे रोजी विकीचा 30 वा वाढदिवस आहे आणि आपल्या बिझी शेड्यूलमधून हा वाढदिवस एकदम धमाकेदार पध्दतीने साजरा करण्याचं विकीने ठरवलं आहे.

एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, विकीने आपल्या 30 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनचा 'जोश'पूर्ण प्लॅन केला आहे. तो दोन आठवड्यांसाठी न्यूयॉर्कला रवाना होणार आहे आणि तिकडे त्यांनी वाडदिवसासाठी एक व्हिलाच बुक केला आहे. कॉलेजच्या खुप जुन्या दोस्तांसोबत वाढदिवस एकदम अविस्मरणीय करण्याचं त्याने ठरवलंय.

https://www.instagram.com/p/BvoelmLF701/

Recommended

Loading...
Share