By  
on  

कान्सच्या तयारीसाठी दीपिका पदुकोणचं जीममध्ये ‘जोर लगा के हैशा’

मेट गालानंतर हॉलिवूडकर आणि बॉलिवूडकर जोमाने कान्सच्या तयारीला लागले आहेत. मेट गालानंतर परदेशातील अत्यंत प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळा म्हणून कान्सकडे पाहिले जाते. या पुरस्कार सोहळ्यात अनेक भारतीय अभिनेत्रीदेखील सहभागी होताना दिसतात. मेट गालामध्ये अदांचे जलवे दाखवल्यानंतर दीपिकाही कान्सच्या तयारीला लागली आहे. दीपिकाने अलीकडेच सुपरफिट दिसण्यासाठी जीममध्ये घाम गाळला. या वेळेचे फोटो दीपिकाने शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Bxbf8ElAWzW/?utm_source=ig_web_copy_link

दीपिका पुर्वाश्रमीची टेनिस खेळाडू असल्याने फिटनेसच्या बाबतीत जागरुक असते. त्यामुळेच दीपिकाच्या परफेक्ट फिगर आणि टोन्ड बॉडीचे चाहते कमी नाहीत. दीपिकाच्या परफेक्ट अपिअरन्समुळेच जगभरातील माध्यमांमध्येही दीपिका एक लीडिंग आयकॉन म्ह्णून ओळखली जाते. या फोटोमध्येही दीपिका कमालीची सुंदर दिसत आहे. यात तिने नियॉन पिंक स्पोर्ट्सवेअर घातले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर दीपिका सध्या ‘छपाक’ या सिनेमात दिपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक सर्व्हाव्हर लक्ष्मी अगरवाल हिची भूमिका साकारत आहे. या सिनेमात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची आलोक दीक्षितची भूमिका साकारत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive