लग्न करण्यासाठी विकी कौशल आहे आदर्श तरुण : तापसी पन्नू

By  
on  

विकी कौशल आणि तापसी पन्नू ही जोडी 'मनमर्झियॉं' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. प्रेक्षकांनासुध्दा ती प्रचंड भावली. दोघंही या सिनेमानंतर एकमेकांचे खुप चांगले मित्र बनले आहेत. पण नुकतंच तापसीने आपल्या या लाडक्या मित्राबाबत एक खुप छान वक्तव्य करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ती म्हणते विकी एक परफेक्ट शादी मटेरिअल आहे.

एका कार्यक्रमादरम्यान तापसी म्हणाली, एक व्यक्ती म्हणून विकी कौशल खरंच खुप चांगला आहे. 'मनमर्झियॉं'चं शूटींग सुरु होण्यापूर्वीच आम्ही एकमेकांचे खुप चांगले मित्र बनलो होतो. आमच्यात एक छान बॉंड तयार झाला होता. आम्ही कधी मित्र बनलो हे मला समजलंच नाही.

Recommended

Loading...
Share