By  
on  

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातला वाद 'या' कारणासाठी पुन्हा चर्चेत

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक गैरवर्तवणूकीचा आरोप केला होता. सध्या या आरोपासंबंधी न्यायालयात सुनावणी चालू आहे. या संबंधी कोर्टाने आजपर्यंत १२ ते १५ साक्षीदारांचा जवाब नोंदवून घेतला आहे. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापैकी एकाही साक्षीदाराला १० वर्षांपूर्वी नेमके काय घडले, हेच आठवत नसल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी लैंगिक गैरवर्तवणूकीचा आरोप केला होता. याप्रकरणी तिने पोलीस ठाण्यात तक्रार नमूद केली होती. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १२ ते १५ साक्षीदारांची चौकशी केली. या साक्षीदारांमध्ये अभिनेत्री डेझी शाह, कोरिओग्राफर गणेश आचार्य इत्यादी सेलिब्रेटींचा सुद्धा सहभाग होता.

परंतु आता अभिनेत्री तनुश्री दत्ताने या साक्षीदारांवर प्रश्न उपस्थित केले आहे. ''हे सर्व साक्षीदार नाना पाटेकरांच्या बाजूचे असून त्यांचा जवाब आणि माझं म्हणणं यात तफावत आढळून येत आहे. माझी लैंगिक गैरवर्तवणूक झाली हे खरं असून ते सिद्ध करण्यासाठी मला साक्षीदारांची आवश्यकता नाही'', असं तनुश्रीचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार, हा कुतूहलाचा विषय असणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive