Exclusive: ही अभिनेत्री करणार आमिर खानच्या आगामी सिनेमात अभिनय

By  
on  

आमिर खानचा आगामी सिनेमा लाल सिंग चड्ढाची सिनेवर्तुनात चर्चा आहे. हा सिनेमा १९९४ साली आलेल्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा अधिकृत रिमेक असणार आहे. या मूळ सिनेमात टॉम हँक्स या अभिनेत्याने प्रमुख भूमिका केली होती. शिवाय या सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. मूळ सिनेमात रॉबिन राईट या अभिनेत्रीने जेनी ही व्यक्तिरेखा साकारली होती. आता हिंदी सिनेमात जेनीची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री यामी गौतम या सिनेमात काम करणार आहे.

या भूमिकेसाठी क्रिती सेनॉनने सुद्धा ऑडिशन दिली होती. परंतु पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार यामी गौतमचं नाव या सिनेमासाठी नक्की करण्यात आलं आहे. यामी मूळ सिनेमातील जेनी कुरान ही व्यक्तिरेखा साकारत आहे जी फॉरेस्ट गम्पची बालपणीची मैत्रीण असते.

आमिर खानने यावर्षी स्वतःच्या वाढदिवसाला 'लाल सिंग चड्ढा' या आगामी सिनेमाची घोषणा केली. आमिर खानचा २०१८ साली आलेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाने आमिर खानच्या चाहत्यांची निराशा केली होती. आता 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमात आमिर खान काय कमाल करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. आमिर खान या सिनेमात प्रमुख व्यक्तिरेखा आहे जी मूळ सिनेमात टॉम हँक्सने साकारली होती. 'लाल सिंग चड्ढा' या सिनेमाचं लेखन अतुल कुलकर्णी करत असून वायकॉम १८ मोशन पिक्चर आणि आमिर खान प्रोडक्शन मिळून या सिनेमाची निर्मिती करत आहे.

'लाल सिंग चड्ढा' या सिनेमासाठी आमिर खानने स्वतःचं वजन २० किलोंनी कमी केलं आहे. २०२० साली ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा  सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share