सलमानच्या दिलखेचक अंदाजाने नटलेलं ‘भारत’ सिनेमाचं जोशपुर्ण नवं गाणं रिलीज

By  
on  

सध्या सगळ्या बॉलिवूडला उत्सुकता आहे ती सलमानच्या ‘भारत’ सिनेमाची. हा सिनेमा ईदचा मुहुर्त साधत रिलीज होणार आहे.  या सिनेमातील ‘जिंदा हुं मै तुझमे, तुझमे रहुंगा जिंदा’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. सलमानची वेगवेगळ्या लूक मधील अदाकारी या गाण्यात पहायला मिळत आहे. या सिनेमातील चौथं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला विशाल ददलानीने आवाज दिला आहे. हे गाणं रसिकांच्यात जोश भरेल यात शंका नाही. विशेष म्हणजे यातील वृद्धाच्या व्यक्तिरेखेतील सलमानही गुंडाना ठोसे लगावताना दिसतो.

https://www.youtube.com/watch?time_continue=9&v=--7kFu0_sEM

‘भारत’ चित्रपटात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा पहायला मिळणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘भारत’ सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे असून अतुल अग्निहोत्री याची निर्मिती करत आहेत. या सिनेमात जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, तब्बू, दिशा पटानी हेसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा ५ जूनला रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Recommended

Loading...
Share