संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या 'मलाल' सिनेमाची पहिली झलक प्रसिद्ध

By  
on  

संजय लीला भन्साळी हे लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. यावेळी ते कोणत्याही सिनेमाचे दिग्दर्शक नसून निर्माते असणार आहेत. संजय लीला भन्साळी हे आपली भाची शर्मी सेहगल आणि विनोदी अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान यांना 'मलाल' सिनेमाद्वारे लाँच करत आहेत. मलाल सिनेमाचा पोस्टर प्रसिदध झाला असून यात हे दोन्ही नवोदित अभिनेते बाईकवर स्वार झालेले दिसून येत आहेत.

https://www.instagram.com/p/Bxlr5-sJhQt/?utm_source=ig_embed

मलाल सिनेमाच्या या हटके पोस्टर नंतर लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगेश हाडवळे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसेच भूषण कुमार, महावीर जैन आणि कृष्‍ण कुमार हेसुद्धा या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. गेल्या काही दिवसांपासून शर्मी आणि मिझान भन्साळींसोबत या सिनेमासंबंधी प्रशिक्षण घेत आहेत. हे दोन्ही चेहरे सर्वांसाठी सरप्राईज असावेत यासाठी या कलाकारांना मीडियापासून दूर ठेवत असल्याची माहिती मिळत आहे.

Recommended

Loading...
Share