By  
on  

‘दे दे प्यार दे’ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, कमावले इतके कोटी

अजय-तब्बू आणि रकुल यांच्या धमाल केमिस्ट्रीने सजलेला सिनेमा म्हणजे ‘दे दे प्यार दे’. १७ मे ला रिलीज झालेला हा सिनेमा रसिकांची गर्दी थिएटरकडे खेचण्यास यशस्वी ठरला आहे.

लिडिंग मिडिया रिपोर्टसनुसार या सिनेमाने दोन दिवसात २२.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने १०.४१ कोटींचा व्यवसाय केला होता. या रोमॅंटिक कॉमेडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. सिनेपंडितांच्या मते, या सिनेमाचा व्यवसाय अजून दोन दिवसात वाढण्याची शक्यता आहे. हा सिनेमा देशभरातील ३१०० थिएटरमध्ये रिलीज केली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अकिब अलीने केलं आहे. अजय स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. अशा वेळी पुर्व पत्नी आणि प्रेमिका सोबतच कुटुंब यांच्या कात्रीत अडकलेल्या अजयची या सिनेमातील अदाकारी पाहण्यासारखी आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive