विवेक ओबेरॉयने शेअर केला असा मेमे, ज्यामुळे त्याला व्हावं लागत आहे ट्रोल

By  
on  

बॉलिवूडमधील सगळ्यात चर्चेत राहिलेल्या प्रेमप्रकरणात सलमान-ऐश्वर्या-विवेक या प्रेमत्रिकोणाचा नंबर सगळ्यात वर आहे. या प्रकरणानंतर या तिघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण या प्रकरणामुळे सलमान आणि विवेक ओबेरॉयमधली शत्रुता थोडीही कमी झालेली नाही.

https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392

आताही विवेकमुळेच या घटनेला उजाळा मिळाला आहे. विवेकने एक मेमे ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. यात ऐश्वर्या सलमान, विवेक आणि अभिषेकसोबत दिसत आहे. निवडणुकीच्या निकालामधून या मेमेमध्ये भाष्य केलं आहे.

यामध्ये ओपिनिअन पोल अस लिहिलेल्या रकान्यात सलमान आणि ऐश्वर्या दिसत आहेत. तर एक्झिट पोल असं लिहिलेल्या रकान्यात विवेक आणि अ‍ॅशचा फोटो आहे तर रीझल्ट असं लिहिलेल्या रकान्यात अ‍ॅश अभिषेक आणि आराध्याचा फोटो आहे.

या मेमेला कॅप्शन देताना विवेक म्हणतो, 'हाहा, क्रिएटिव, कोई राजनीति नहीं यहां, जस्ट लाइफ'.  पण या ट्वीनंतर मात्र विवेकला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. युजर्सनी त्याच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहे.

Recommended

Share