सैफ अली खानचा हा लुक बघून तुम्ही चक्रावून जाल

By  
on  

मागील वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये सैफ अली खानने सॅक्रेड गेम्स हि वेबसिरीज करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. सैफ अली खानची या सिरीजमधली भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली. तसेच मागील वर्षी आलेल्या 'बाजार' या त्याच्या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. २०१९ मध्ये सैफ अली खान कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार, याची सर्वांना उत्सुकता होती.

अखेर सैफ अली खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक प्रसिद्ध झाला असून या लुक मध्ये सैफ अली खान एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. डोळ्यांमध्ये काजळ, कपाळाला भस्म अशा काहीश्या भयावह अवतारातला सैफ अली खानचा हा लुक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. सैफच्या या आगामी सिनेमाचं नाव 'लाल कप्तान' असं असून हा सिनेमा भारतातील नागा साधूंच्या जीवनशैलीवर आधारित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'एन एच १०' या यशस्वी थ्रिल्लर सिनेमाचे दिग्दर्शक नवदीप सिंग हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. आनंद एल राय हे या सिनेमाचे निर्माते असून हा सैफ अली खानचा हा आगामी सिनेमा ६ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात झळकणार आहे.

Recommended

Share