By  
on  

Exclusive: सौन्दर्यवती मानुषी छिल्लर करणार अक्षय कुमार सोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण

२०१७ मध्ये मानुषी छिल्लर ने बुद्धिमत्तेच्या आणि सौन्दर्याच्या जोरावर 'मिस वर्ल्ड' ही स्पर्धा जिंकली. ही सौन्दर्यवती सिनेमात पदार्पण कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर पिपींगमुनला मिळालेल्या माहितीनुसार मानुषी पृथ्वीराज चौहान यांच्यावरील बायोपिकमध्ये दिसणार असून यात ती सुपरस्टार अक्षय कुमार सोबत झळकणार आहे. या आगामी सिनेमात मानुषी पृथ्वीराज चौहान यांची पत्नी संयुक्ताच्या भूमिकेत असणार आहे. या भूमिकेसाठी तिने तयारी सुरु केली आहे.

 

तसेच या सिनेमाशी संबंधित एका व्यक्तीकडून पिपिन्गमूनला माहिती मिळाली आहे की, मानुषीसोबत एक अजून एक अभिनेत्री या सिनेमात असून हे अभिनेत्री कोण असणार याबाबत मात्र अद्याप माहिती मिळू शकली नाही. यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु आहे.

या सिनेमाचं शूटिंग जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. टीव्हीवरील चाणक्य या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तसेच यशराज फिल्म्स हे या सिनेमाचे निर्माते आहेत. अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीला मानुषीला यशराज फिल्म्सच्या अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive